Friday, 3 March 2017

आम्ही हायड्रोपोनिक चार म्हणजेच माती शिवाय तयार करण्यात येणारा चारा तो तयार करण्यासाठी ७ किलो ८८० ग्रॅम मका घेऊन तो निवडून घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला.नंतर तो मका ४ लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवला. तो भिजत ठेवलेला मका सुमारे १२ तास भिजत ठेवणे गरजेचे असते.

             नंतर आम्हाला काही शेती आणि पशुंसंदर्भात करावयाच्या कामांची माहिती आणि 

शेतीतील उपयुक्त साधनांची ओळख

1.   फावडे :- फावडे हे शेती विभागाचे प्रमुख साधन आहे. तो पसरलेल्या वस्तू उदा.-माती,खात,कचरा,तण,इ. एकत्र करतो व दुसर्या मध्ये ठेऊ शकतो.
2.   घमेल :- फावड्याने एकत्र केलेली वस्तू घामेल्यामध्ये भरून वस्तूची ने-आण करू शकतो. त्या वस्तूची स्थानातरण करू शकतो.
3.   खुरपे :- हे प्रामुख्याने कापण्याचे काम करते. त्याला करावतीप्रमाणे बारीक टोके असतात. सर्वसाधारण गवात कापण्यासाठी उपयुक्त आसतो.
4.   विळा :- हा प्रामुख्याने कापण्याचेच काम करतो पण त्याला प्लेन धार लावली जाते.जेणे करून गवत लवकर कापला जावा. समोरचे टोक ओढण्याचे काम करते.
5.   पात ब्लेड :- हा ब्लेड सुद्धा कापण्याचे काम करतो.पण हा चपाटा असून तो फांद्या ,बांबू अशाप्रकारे वस्तू कापायला मदत करतो.
6.   टिकाऊ :- टिकाऊ हा खोदण्याचे काम करतो.त्याला दोन टोक असतात. त्यातील एक टोकेरी व एक सरळ चपटी टोक असते. हे खोदण्याचे साधन म्हणून शेतीतील महत्वाचे साधन आहे.
7.   कुदळ :- कुदळ हे देखील खोदण्याचे काम करते पण हे खोलवर खोदत नाही. हे विशिष्ट अंतरापर्यंत खोदले जाते.याला एकाच साईड असते. त्याच्या टोकाला खुंटी म्हणतात.
8.   कोळप :- हे साधन गवत,शेतातील तन काढायचे काम करते. सध्या सरी समांतर करण्यास कोळप्याचा उपयोग करतात. याला समोर वाकलेले दात असतात.
9.   नांगर :- शेतात पिक लावण्यासाठी नांगार्ण्याचे साधन उपयुक्त असतात. विविध पिकासाठी  विविध तर्हेचे नांगर उपलब्ध आहेत. हे जमीन उकर्ण्याचे काम करते.
10.                     कोयती :- हे देखील कापण्याचे काम करते. याला सरळ धार असून वजनाने जड असते तिला निमुळता भाग असतो. फांद्या,बांबू कापण्यासाठी उपयुक्त असते.

मानवी शरीरातील रक्त गट चेक करणे


उद्देश :- मानवी शरीरातील रक्त गट चेक करणे.

साहित्य :- रक्ताचा नमुना,कापूस,ग्लास स्लाईड,इत्यादी.

साधने :-  लॅणसेट.

केमिकल :- अल्कोहोल,स्पिरीट,anti- A,B,D.

कृती :- १) प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

      २) स्पिरीट मध्ये बुडवलेला कापूस बोटाला चोळून घ्यावा.

      ३) बोटाला लॅणसेटने टोचून घ्यावे.

      ४) स्लाईड वर तीन रक्ताचे थेंब घ्यावे.

      ५) त्यानंतर anti A,B,D अनुक्रमे टाकावे.

     ६) anti liquid व रक्त निट मिक्स करून घ्यावेत.

     ७) त्या उजेडात पहाव्यात त्यात रक्ताच्या गुठळ्या दिसतील.


     ८) त्यावरून रक्त गट ओळखावा.

अझोला बेड तयार करणे



*अझोला बेड तयार करणे*

उददेश :- पशुपालनासाठी अझोला हे पिक महत्वाचे आहे. त्यासाठी अझोला उत्पाद्दन घेणे.

साहित्य :- अझोलाची एक जात, १ kg शेण, ssp खत, मिनरल मिक्शर, इत्यादी...

साधने :- फावडे, कुदळ, घमेल, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी...  

कृती :- १) प्रथम अझोला बेड तयार करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करून घेणे.

       २) जिथे बेड तयार करायचा आहे तिथे आखणी करून घेणे.

       ३) ठरलेल्या मापानुसार बेड खोडून घेणे. साधारण ठरलेले माप ७५*३*१ft असे खोडून घेणे.

                                     I.            बेडची साईझ = ७५*३*१ ft
                                   II.            मिनरल मिक्शर = ९० gm
                                III.            ssp खत  ९० gm
                                IV.            शेण खत = ९ kg
                                  V.            माती = ९ kg

असे प्रमाण प्रती बेड वापरले.

     ४) बेडवर प्लास्टिक पेपर अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेतली.

     ५) त्यात शेणाचे पाणी ओतले.

     ६) बेड पाण्याने भरून घेतले.

     ७) त्यामध्ये ssp खत मिक्स करून सोडले.

     ८) तसेच मिनरल मिक्शरचे पावडरचे पाणी करून ओतले.

       ९) नंतर १ kg अझोला धुवून पाण्यावर पसरवला.

      १०) अझोला एकावर एक येणार नाही याची दक्षता घेतली. अश्याप्रकारे अझोला बेड तयार केले.

अनुमान :- १) प्रती बेड दोन वेळा पाणी देवून आठवड्यात अझोला बेड पूर्ण भरतो.

         २) अझोला काडल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.
 
निरीक्षण :- १) अझोला सावलीत असताना पोपटी रंगाचा दिसतो व मोठा जाल्यावर हिरवा करडा रंगाचा दिसतो.

अझोलाचे फायदे :- १) आजोळ गाईला दिल्यावर दुधात वाढ होते.

                     २) अझोला शेळीला दिल्यास तिच्या दुधात व मांसात वाढ होते.

                     ३) अझोला कोंबड्यांना दिल्यास त्यांच्या वजनात वाढ होते.



 जमिनींचे अंतर मोजने

१]१  फुट =२.५ सेंटी मीटर

२]३० मीटर =१ फुट


३]३.३ फुट =१ मीटर

४]१ मीटर=१०० सेंटी मीटर

५]१ गुंठा =३३*३३ फुट

६]१ गुंठा  =१०*१०

७]१ गुंठा=१०८९ चौ मीटर फुट

८]१ गुंठा=१०० मीटर गण

९] १ एकर=४० गुंठे

१०] १ एकर=४३५६० फुट

११]१ हेक्टर =१०० गुंठे

१२] १ हेक्टर=१०८९० चौ मीटर

१३]१ इच =२५ mm
खताचा डोस काडणे .
 
रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्याष्टी जमिनीच्या सुपिक्तेनुसार खताचे प्रमाण ठरवले जाते .
१०० kg  N ,S SP,MOP ,मध्ये अनुक्रमे ४६%: १६%: ६०% हे प्रमाण आहे ,तर १किलो साठीचे डोसचे प्रमाण काडा .

1KG=  N =100/46=2.17KG. -YURIYA

1KG=SSP=100/16=6.25KG –SPURD

1KG=MOP=100/1.66KG-PALASH 
 
अशाप्रकारे खताचा डोस काढला .




मातीचा नमुण्याचे परीक्षण केले

उदेश :-मातीचे असलेले नत्र ,सुपरप ,पालाश हे घटक तपासून चाचणी करणे

साहित्य :-नमुना घेतलेली माती 
.
         साधने :-खुरप,घमेल,गाळणी ,माती टेसटीग कीड ,इलेक्ट्रिक,मृदाप्रिक्षक्षनकीड . 

साधने ; -खुरपे ,घमेल ,गाळणी ,माती टेस्टिंग किट ,इत्यादी .....


प्रात्याक्षिक कृती ; जागेच क्षेत्र पाहून किती नमुने घ्यावयाचे आहेत ते ठरवले .जमिनीत व्ही आकाराचा खड्डा करून मातीचे नमुने घेतले .माती वळवून टी चाचणी घेताना कागदावर गोलाकार पसरून त्याचे चार भाग विरोधी स्पर्शाने घेउव्न योग्य मातीचा नमुना घेतला .५०० ग्र्यम माती परीक्ष्णासाठी निवडली .आम्ही “प्रेरणा माती परीक्षण कीट “वापरले .त्यानुसार मातीमध्ये असलेले नत्र ,स्पुरद ,पालाश या चाचण्या घेतल्या .



निष्कर्ष :१]n=vheri low140
                        2]ph=7.5
                        3]kg/ha=vheri low
                       4]sp=vheri low      अश्या प्रकारे दाखवण्यात आला .