Friday 3 March 2017

शेतीतील उपयुक्त साधनांची ओळख

1.   फावडे :- फावडे हे शेती विभागाचे प्रमुख साधन आहे. तो पसरलेल्या वस्तू उदा.-माती,खात,कचरा,तण,इ. एकत्र करतो व दुसर्या मध्ये ठेऊ शकतो.
2.   घमेल :- फावड्याने एकत्र केलेली वस्तू घामेल्यामध्ये भरून वस्तूची ने-आण करू शकतो. त्या वस्तूची स्थानातरण करू शकतो.
3.   खुरपे :- हे प्रामुख्याने कापण्याचे काम करते. त्याला करावतीप्रमाणे बारीक टोके असतात. सर्वसाधारण गवात कापण्यासाठी उपयुक्त आसतो.
4.   विळा :- हा प्रामुख्याने कापण्याचेच काम करतो पण त्याला प्लेन धार लावली जाते.जेणे करून गवत लवकर कापला जावा. समोरचे टोक ओढण्याचे काम करते.
5.   पात ब्लेड :- हा ब्लेड सुद्धा कापण्याचे काम करतो.पण हा चपाटा असून तो फांद्या ,बांबू अशाप्रकारे वस्तू कापायला मदत करतो.
6.   टिकाऊ :- टिकाऊ हा खोदण्याचे काम करतो.त्याला दोन टोक असतात. त्यातील एक टोकेरी व एक सरळ चपटी टोक असते. हे खोदण्याचे साधन म्हणून शेतीतील महत्वाचे साधन आहे.
7.   कुदळ :- कुदळ हे देखील खोदण्याचे काम करते पण हे खोलवर खोदत नाही. हे विशिष्ट अंतरापर्यंत खोदले जाते.याला एकाच साईड असते. त्याच्या टोकाला खुंटी म्हणतात.
8.   कोळप :- हे साधन गवत,शेतातील तन काढायचे काम करते. सध्या सरी समांतर करण्यास कोळप्याचा उपयोग करतात. याला समोर वाकलेले दात असतात.
9.   नांगर :- शेतात पिक लावण्यासाठी नांगार्ण्याचे साधन उपयुक्त असतात. विविध पिकासाठी  विविध तर्हेचे नांगर उपलब्ध आहेत. हे जमीन उकर्ण्याचे काम करते.
10.                     कोयती :- हे देखील कापण्याचे काम करते. याला सरळ धार असून वजनाने जड असते तिला निमुळता भाग असतो. फांद्या,बांबू कापण्यासाठी उपयुक्त असते.

No comments:

Post a Comment