Thursday 9 March 2017


दिनांक :१७/११/२०१६मातीचा नमुण्याचे परीक्षण केलेमातीचे आम्ही या दिवशी माती परीक्षणाचे प्रॅक्टीकल केले.
शेतातील माती मध्ये असलेले नत्र ,स्फुरद , पालाश या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त घटकांचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे तपासून पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते.   यासाठी माती परीक्षण किट असणे गरजेचे आहे. माती परीक्षण करत असताना शेतातील माती  फक्त एकाच जागेतून  न घेता Z आकारात घेतली पाहिजे. आणि माती काढताना नेहमी V आकाराचा खड्डा खणून घ्यावी कारण V आकारात घेतल्याने माती वेगवेगळ्या थराची मिळते. ती घेतलेली माती वाळवून तिचे परीक्षण करताना एका कागदावर ती माती गोलाकार पसरवून तिचे चार भाग करून त्यामधील योग्य मातीचा नमुना घेतला  आणि “प्रेरणा माती परीक्षण कीट” वापरून माती परीक्षण केले.


No comments:

Post a Comment